येत्या वर्षात आशय समृध्दी साठी काही विशेष कार्यक्रम राबवावा अशा विचाराने मी काही दिवसांपूर्वी एक प्रस्ताव नीलकांतसमोर मांडला होता. चांगली पुस्तके निवडून ती पुन्हा एकदा मिपावर क्रमशा प्रकाशित करावी असा ढोबळ प्रस्ताव होता. त्यानुसार श्री श्रीकांत बोजेवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या वास्तवदर्शी सिनेमा या विषयावरचे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. या महीन्यात नीलकांत ठाण्यात आल्यावर श्रीकांत बोजेवार यांच्यासोबत चर्चा करून वास्तवदर्शी चित्रपट हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. या पुस्तकाचे हक्क शांताराम फाउंदेशन कडे आहेत. श्री किरण शांतारम यांची हरकत नसल्याचे बोजेवारांनी कळविल्यावर पुस्तक टंकण्याची मेहेनत सुरु केली. मिपासदस्य प्रशांत तायडे -किसन शिंदे - गवि -मिका- वल्ली यांच्यासहकार्याने काम वेगात सुरु करून आज पहीला भाग प्रकाशित करण्याच्या तयारीत आहे. आज रात्री प्रशांत आणि किसन प्रकाशनाची व्यवस्था करणार आहेत. उद्या सकाळी नविन वर्षाच्या पहील्या दिवशी प्रकाशन होईल.प्रत्येक आठवड्यात एक भाग असे करून महीन्यात पूर्ण प्रकाशन होईल.
किसन शिंदे यांनी पाठपुरावा करण्याचे काम सांभाळल्याने माझे काम सोपे झाले.
आपणा सर्वांकडून या उपक्रमाबद्दल प्रतिक्रियांची वाट बघत आहे.
नविन वर्षाच्या शुभेच्छा.