नमस्कार,
हा विषय निघायचे कारण असे की आज वाहिदाचा एक व्यनि आला आहे आणि त्यात अनाम नावाचा सदस्यं तिला विनाकारण त्रास देतो आहे असं म्हटले आहे. तसेच स्पष्ट न बोलता केवळ इशार्याने हा सदस्यं टारझन असावा असं ती म्हणतेय.
हा केवळ आजचा उल्लेख आहे मात्र मला या विषयावर संपादकांचं मत हवं आहे की काही सदस्यं कायम तक्रार करत असतात. त्यांच्या सोबत कसं वागावं. याच पंगतीतील पुढील नाव चेतन सुभाष गुगळे आहे. अश्या लोकांना सर्व काही आपल्या मनासारखं झालेलं हवं असतं.
वाहिदाचा उल्लेख निघालाच आहे तर तीने गुगळेच्या आता येणे नाही... च्या धाग्यावरील प्रतिक्रिया वाचावी. म्हणजे लक्षात येईल. याच संदर्भात एक बाब सांगतो. पर्याच्या पुस्तकप्रकाशनाच्या दिवशी वाहिदा आली होती. तिचे फोटो येऊ नये असे तीने सांगीतले होते. तरी थत्तेचाचांनी जेवताना एका ग्रुप फोटो मध्ये तिचा फोटो घेतलाच.
दुसर्या दिवशी तो फोटो टाकला. आणि वाहिदाने तांडव सुरू केले. मी प्रवासात होतो तरी 'आताच्या आता तो फोटो काढा वगैरे...' सगळं झालं. शेवटी थत्तेंना तो फोटो मुळ जेथे चढवला होता तेथून डिलीट करायला लावून तो फोटो काढल्या गेला.
यावर दोन तीन दिवसांनी मला फोनवर वाहिदा अन्य मिपाकरांना मिपा आणि मिपाकर कसे वाईट हे सांगत सुटल्याचे कळले.
मला एवढंच म्हणायचं आहे की या लोकांना नाही पटत तर यांनी येथून जावं किंवा त्यांच्या मते मिपा, व्यवस्थापन किंवा व्यक्तीशः मी कुठे चुकत असेल तर तसा संवाद साधावा. केवळ वाद करावा आणि आपण समुहाच्या वेगळे कसे हे सांगत सुटण्याचा सोस असेल तर तो आपण का सहन करावा?
मी कुणावरही कारवाई करण्याचे सूचवत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अश्या लोकांच्या तक्रारी आपण थोड्या दिरंगाईने अटेंड केल्या तर चालणार नाही का?
एवढंच नाही , मला तर आज मोह झाला होता की तीला आणि गुगळेला जाऊन संदेश टाकावा की बाबारे नाही पटत तर चालू पडा ना ! .... पण जाऊ द्या... थोडा वेळ वाट बघुया म्हणून थांबलो.
( अनाम वरील कारवाई तात्काळ करू नये असे मला वाटते. मात्र माझा तसा आग्रह नाही. संपादक मंडळ घेईल तो निर्णय मान्य. )
- नीलकांत