२१) वेळणेश्वरला आम्हाला अगदीच संध्याकाळ झाली म्हणून आम्ही तिथल्याच समुद्रकिनार्या जवळ असणार्या एम.टी.डी.सी. च्या रुम्स मध्ये राहीलो. तिथे रात्री अगदी शांत, थंड आणि समुद्राच्या लाटांचा आवाज ह्या वातावरणात आम्ही गप्पा मारत बसलो. ही सकाळ

२३)मला सगळ्यात जास्त आवडलेला हा नजारा.
२४) तिथे हे पक्षी भरपूर होते पण पोझ देत नव्हते.

२५) पारव्याने मात्र व्यवस्थित भाव न खाता फोटो काढून दिला.

२७) तिथुन निघून आम्ही प्रथम हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो.

२८) हेदवीच्या गणपतीच्या आजूबाजूचा हिरवागार परीसर.

३०) ही फुले कोकणात सगळीकडेच पहायला मिळाली.

३१) तिथून आम्ही मालवणच्या दिशेने निघालो त्या वाटेतील दृश्ये.

३३) मालवणात जाता जाता अचानक भराडी देवीच्या दर्शनाला जायचे ठरले. आणि इतके सुंदर मनमुराद दर्शन झाले की आम्हाला खुप प्रसन्न वाटून दिवसभराचा थकवा क्षणात दूर झाला. तिथे स्ट्रीक्टली देवीचा फोटो काढणे मनाई आहे.

३४) त्या रात्री तारकर्लीला राहून आम्ही सकाळी समुद्र सफर करण्यास सज्ज झालो.

३५) तारकर्लीच्या किनार्यावर लागलेल्या बोटी ह्या समुद्र सफर घडवून आणणार्या फायबरच्या बोटी आहेत. आम्ही लाकडाची बोट घेतली होती.

३६) ही आम्ही बुक केलेली लाकडी बोट. बिचारे ते बोटवाले खुप कष्ट करून बोट आत नेतात आणि बाहेर आणतात.

३८) तिथले सगळेच समुद्रकिनारे स्वच्छ आणि अप्रतिम. तारकर्लीच्या समुद्र किनार्यावे हे शंख शिंपले आलेले. त्यातील पाण्यातले बरेचशे शंख जिवंतही होते.

४१) अफाट समुद्र आम्ही बोट मध्ये बसुन न्याहाळत होतो.












