रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग ३


(इथे हा वरचा दिवा काही मला चुकवता आला नाही. :( )


माझे प्रेरणा स्थान.

माझे मनोगतः ---अनेक वेळा मी पाहिले आहे की...रस्त्यावर कोळशाने /खडुने एखादा चित्रकार साईबाबा,शंकर इं चित्र काढतो,त्यात रांगोळी किंवा रंगाने ते चित्र जिंवंत करतो ! काय जादु आहे अश्या कलाकारांच्या हातात नाही का ? कसे जमते यांना इतकी सुंदर रेखीव चित्रे काढायला ? अत्यंत चिकाटीने साध्य होणारी ही कला विविध विषयांचा सहज वेध घेते,बघणार्‍याला भारावुन टाकण्याची एक अनोखी शक्ती या कलेत आणि कलाकाराच्या हातात असते...

अजुनही ही रांगोळीची कला या मेहनती कलाकारांच्या अथक परिश्रमामुळे जिंवत आहे याचा मला आनंद आहे,आणि असे अनेक कलाकार निर्माण व्हावे अशी माझ्या मनाची इच्छा आहे... दिवाळीत या कला प्रदर्शनाचा जो आनंद मला उपभोगता आला,तोच आनंद मिपाकर वाचकांना घेता यावा यासाठीच मी हे फोटो काढले.

माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो...

प्रदर्शन स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....

भाग १

भाग २