रंगावली प्रदर्शन २०११ (गिरगांव रंगावली ग्रुप) भाग २

माझे मनोगतः ---

रांगोळी ही कला मला फार भावते.इतकं सुंदर चित्रण साकारताना किती मेहनतं लागत असेल, हे एखादी पूर्ण झालेली रांगोळी पाहुन लगेचच कळते नाही ? अर्थातच हो... कलाकारांच्या बोटातली जादु तुम्हाला काही क्षणातच एका वेगळ्या भाव विश्वात घेउन जाते... तुम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडते, एखाद्या घटनेची तुम्हाला आठवण करुन देते.माझ्या शाळेत मी रांगोळी प्रदर्शन पहायला गेलेल्याचे मला आठवते,तसेच संस्कार भारतीच्याही मी रांगोळ्या पाहिल्या आहेत.या कलेत इतकी विविधता साकारताना वापरली जाणारी माध्यमं म्हणजे रांगोळी आणि रंग ! जमिनीवर काही वेळातच साकारले जाणारे एक कलाचित्र. :)
स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....

भाग १