नवीन शक्कल

नमस्कार संमं,
सध्या तरी मिपावर गोंधळ गडबड न होता बरे धागे येत आहेत. यावेळातच जर आपण विचार करून नवीन शक्कल लढवली तर ज्यावेळी फारसे लेखन येत नसते त्यावेळची सोय होवू शकेल असे वाटते. आपणा सर्वांचे मत अपेक्षित आहे. दिवाळीच्या धाग्याचा हेतू बर्‍यापैकी सफल झाला होता. आता ते धागे उडवले तर चालतील का? दुसरे असे की फारसे लेखन न येण्याच्या काळात फुटकळ, जातीयवादी हेतूने केलेले दंगेखोर धागे निस्तरण्यापेक्षा एखादा विषय संमं कडून सदस्यांना दिला गेला तर तर ते चांगल्या प्रकारे एंगेज राहू शकतील. उदा. एखाद्या विनोदी अडचणीतून कसा मार्ग काढलात हे ३०० शब्दात सांगा. एखाद्यावेळी सवय नसताना गाडी चालविणे, स्वयंपाक करणे ई. करावे लागले का? काय प्रसंग घडला? हे उदाहरणादखल सांगितले आहे पण असा एखादा प्रकार तयार ठेवला तर उपयोगी पडेल.
धन्यवाद!