दिवाळीनिमित्त लेखमाला, स्पेशल कन्टेन्ट इत्यादी इत्यादी ...

सध्या चावडीतल्या काही धाग्यांवर मी अनेकांच्या दिवाळीची तयारी, त्यानिमित्तचे खास आयटम्स, धागे इत्यादींचे उल्लेख वाचतो आहे.
तसे काही लेखन यावे अशी माझीही इच्छा आहे
( मी स्वतःही 'आठवणीतली दिवाळी' हा लेख लिहणार आहे पण तुर्तास त्याचा वायदा करत नाही, ऑलरेडी ह्याबद्दल बदनाम आहे ते पुरेसे आहे, असो )

तर ह्याच संदर्भात आपल्या संपादकांपैकी काहींनी पुढाकार घेऊन नवे धागे / नव्या स्पर्धा / नवे उपक्रम जाहीर करावेत असे सुचवतो.
माझ्या काही रफ कल्पना :
१. दिवाळीनिमित्त केल्या जाणार्‍या रुचकर पदार्थांचे फोटो / पाककृती आदी तत्सम ( गणपा सोडुन इतर जणांसाठी ;) )
२. आकाशकंदिल किंवा अन्य सजावट ( पणत्यांची रांगोळी तत्सम ) ह्यांची स्पर्धा
३. दिवाळीनिमित्त बांधले जाणारे किल्ले आदींची स्पर्धा
४. दिवाळीत टायमिंग साधुन काढलेले काही उत्तम फोटो ( लहानग्यांचे फटाके उडवताना, किल्ले बांधताना, भाऊबीज इत्यादी )
५. दिवाळीचे लेख वगैरे ...

सध्या रेवतीताई, विकासराव, पैसाताई ह्यांचा उत्साह पाहुन त्यांना सदरील आयडिया वर्क-आउट करण्याची विनंती करतो. मी हे स्वतः केले असते पण आज दुपारपासुन ते शुक्रवारपर्यंत आमची क्लायंट व्हिसिट असल्याने मी अंमळ बिझी असेन व मला वेळ काढुन ह्या विषयाला न्याय देता येणार नाही.
कृपया पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती :)

ता.क. :
ह्या दिवाळीच्या कालखंडात मिपाच्या लुकमध्येही बदल करुयात, काही फोटो आणि आकाशकंदिल वगैरे लाऊयात.
मी ह्याबाबत प्रशांत आणि नीलकांत ह्यांना लक्ष घालण्याची विनंती कर्तो, मदत करण्यस मी तयार आहे.