आक्षेपार्ह आणि व्यक्तीगत

नमस्कार,

सर्वप्रथमः ही चर्चा मी पाटीलकीत चालू करत आहे, तेंव्हा सर्वांना विनंती की ह्यातील मजकूर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाहेरील व्यक्तीस समजू नये. ती येथेच रहावी...

माझ्या दहशतवाद आणि प्रतिक्रीया या लेख-चर्चेत भाग घेत असताना, अलख निरंजन नामक जो कोणी आयडी असेल आणि जो कोणी त्या आयडीचा वापर करत असेल त्याने या आता अप्रकाशीत केलेल्या प्रतिक्रीयेत http://misalpav.com/node/18520#new, माझे आणि चित्राचे नाव एकत्र लिहून जणू काही आम्ही एकत्र लिहीत आहोत असे सुचवत अतिशय व्यक्तीगत चिखलफेक केलेली आहे.

माझ्याशी कोणी गंभिर वाद घालत असताना मला वाटेल तसे बोलले / लिहीले तर मी संपादकीय हक्क वापरत नाही. पण आता अती झाले आहे.