- 45 views
नमस्कार,
आज विजूभाऊंच्या रावण ह्या धाग्यावर अतिशय खालच्या पातळीवर प्रतिक्रिया दिल्यामुळे टारझन व गोगोल या दोन सदस्यांवर कारवाई करण्यात येत आहे आणि त्यांचे खाते गोठवण्यात येत आहे.
येथे त्यांच्या अप्रकाशित केलेल्या प्रतिक्रिया आहेत. संपादकांनी त्यावाचून आपले मत द्यावे ही विनंती.
हे असलं लेखन आणि त्याला दिलेल्या त्याच दर्जाच्या प्रतिक्रिया म्हणजे आपल्या मनातील घाण निचरा करण्यासाठी मिसळपावचा वापर होताना दिसतोय. हे चुक आहे. तसेच कुणी खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्या प्रतिक्रियेवर कारवाई करण्यासाठी संपादक मंडळ आहे याचा विसर पडलेला दिसतोय.
सबब दोघांचे खाते मी गोठवत आहे.
मागे घोषणांमध्ये याची जाहीर सूचना आपण द्यायचो. मात्र त्यानंतर अशी घोषणा ही वैयक्तीक अपमानाच्या स्वरूपात घेतल्या जाते व पुढे खुलाश्याचे प्रकार वाढतात. दोघांनाही माझा ईमेल माहिती आहे हे आता गृहीत आहे. काही बोलायचे असल्यास ते बोलतील. त्यामुळे अश्या प्रकारची कुठलीही घोषणा मी करीत नाहीये.
- नीलकांत
- नीलकांत