फिनिक्सची भरारी....?

आयर्लंडकडून जबरदस्त चपराक बसल्यावर आणि समस्त इंग्लिश क्रिकेटप्रेमींच्या टीकेचे लक्ष्य झालेली स्ट्रॉस आणि कंपनी ढेपाळून गेलीच होती आणि तिचे प्रत्यंतर आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ज्या पद्धतीने क्रमाने त्यांचे फलंदाज नांगी टाकीत गेले ते पाहिल्यावर असेच वाटले की आजच इंग्लंडची टीम " पुरे झाले बाबानू....जातो आम्ही लॉर्डसकडे परत..." म्हणत आज पॅकिंग करणार. १७१ चे सोपेसे लक्ष्य गाठायला स्मिथ, अमला आणि कलिस किती ओव्हर्स घेणार एवढाच प्रश्न होता.

~~~~ आणि क्रिकेट किती अनिश्चततेचा खेळ आहे याची परत एकदा प्रचिती आली. इंग्लंडच्या फलंदाजांनी नव्हे तर त्यांच्या गोलंदाजांनी नेमक्या वेळेला कमाल केली.....आणि ही रोमहर्षक लढत केवळ ६ धावांनी जिंकली.....१७१ धावा द.आफ्रिकेचे बलाढ्य फलंदाज काढू शकले नाहीत....आणि ब्रॉड्+अ‍ॅण्डरसन या दुकलीने स्ट्रॉसच्या आशा पुन्हा प्रज्वलित केल्या.

सारा भारत बेंगलोरकडे लक्ष देऊन बसल्याने द.आफ्रिका वि. इंग्लंड हा सामना किती रंगतदार होईल याची कल्पनाही कुणाला आली नाही.

इन्द्रा