साहित्यः
१ वाटी मैदा
१/४ वाटी पिठीसाखर
१ टेस्पून तूप मोहनासाठी
२ टेस्पून तूप + २ टेस्पून कॉर्नफ्लोअर एकत्र करून साटा तयार करणे
खायचा शेंदरी रंग २ थेंब
१ टीस्पून दुधात केशर मिसळून घेतलेले
तळण्यासाठी तूप
सजावटीसाठी पिस्त्याचे काप

पाकृ:
मैद्यात थोडेसे मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून पाण्याने किंवा दुधाने पीठ घट्ट मळून घ्यावे.
भिजवलेले पीठ अर्धा तास झाकून ठेवावे.
भिजवलेल्या पिठाच्या गोळ्याचे चार भाग करावे.
दोन भागात खाण्याचा शेंदरी रंग घालून एकत्र करावा.
एका भागात केशरमिश्रित दूध घालून एकत्र करावे व एक भाग पांढराच राहू द्यावा.
तयार उंड्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्यावा.
पोळीवर साटा लावून दुसरी पोळी ठेवावी, परत साटा लावून तिसरी पोळी ठेवावी व पुन्हा साटा लावून चौथी पोळी ठेवावी.
अलगदपणे पोळ्यांचा रोल तयार करावा व त्याचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.
तुकडे जिथून कापले आहेत, त्या बाजूने हलके दाबून लाटावे.

गरम केलेल्या तुपात तयार चिरोटे मध्यम आचेवर तळावे. चिरोट्यावर अलगदपणे तूप उडवावे, म्हणजे छान पदर सुटतात.
तळल्यावर वरून लगेच पिठीसाखर भुरभुरावी व पिस्त्याच्या कापांनी सजवावे.


चिरोट्यांवर पिठीसाखर भुरभुरण्याऐवजी साखरेचा पाकही घालू शकता.
