संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २

नमस्कार,

मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे

१) गवि
२) वल्ली
३) किसन शिंदे
४) लीमाऊजेट
५) aparna akshay

सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल.

तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) छोटा डॉन
२) निखील देशपांडे

आता पर्यंत या आणि अन्य अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.